पेज

२६.११.२३

* काही करून मीही होणार मुख्यमंत्री


काही करून मीही होणार मुख्यमंत्री 

माझ्यापरी न दुसरा

दिलदार मुख्यमंत्री !


अभिनय बघून माझा ऑस्कर मिळेल नक्की

फोटोत हासणारा बेजार

मुख्यमंत्री !


खाऊन काय खावे उरले न

खावयाला

डोके भल्याभल्यांचे खाणार मुख्यमंत्री !


येईन मी पुन्हा रे, देतो वचन तुम्हाला

ऐसी शपथ नव्याने घेणार मुख्यमंत्री !


जनता खुळी बिचारी चर्चा करीत बसते -

''येणार मुख्यमंत्री जाणार मुख्यमंत्री !''


अख्ख्या जगात कोठे उपचार सापडेना

आहे असाध्य मोठा आजार मुख्यमंत्री !


परजून घेतलेले कंठासवे जिभेला

गाणे बगावतीचे गाणार मुख्यमंत्री !


मेली तरी मरू द्या आताच लोकशाही

टिटवे पुढे सुखाने धरणार मुख्यमंत्री !


■ देशोन्नती दिवाळी २३


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा