पेज

२४.१०.२१

तुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावा

तुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावा;

मन मेले तर मरो बिचारे,खुशाल त्याला खांदा द्यावा.


गाव बुडाले,देश बुडाला;बुडू लागली देव-माणसे;

पोटामागे धावत धावत परदेशाचा मार्ग धरावा.


कवितेमधल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका;

वधू चांगली कमावती अन् वरून नगदी हुंडा घ्यावा.


पाठीमागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा;

नोटावरचा फोटो त्याचा कधी टेबलाखालुन घ्यावा


मुलगा-मुलगी,बहीण-भाऊ,काका-पुतण्या,मामा-भाचा;

बाप व्हावया या सर्वांचा जमेल त्याचा गळा चिरावा.


( ‘नव अनुष्टुभ’ दिवाळी २०११  )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा