पेज

१३.१२.१९

घाव माझ्या अंतरीचा आज बोलू लागला

घाव माझ्या अंतरीचा आज बोलू लागला
संगीत : गायक : दिनेश अर्जुना

 -



घाव माझ्या अंतरीचा आज बोलू लागला
चेहरा  गर्दीत कोणी ओळखीचा वाटला

त्या क्षणाला वाटले की विश्व सारे थांबले
थांबलेला श्वास वाटे, काळ वाटे थांबला !

आठवे ती भेट तेव्हा चांदण्या रात्रीतली
तो सुगंधी संगतीने डाव होता रंगला

लोचनांची मूक भाषा लोचनांनी जाणली
आसवांचा पूर तेव्हा पापण्यांशी दाटला

जीवनाला काय घाई थांबले नाही कुणी
दूर गेल्या दोन वाटा जीव झाला एकला
............................................


त.भा. दिवाळी ८६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा