पेज

२२.२.१८

प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी

प्रेमात ठेव पोरी व्यवहार पारदर्शी
होईल मग सुखाचा संसार पारदर्शी 
.
प्रत्येक ग्राहकाला कापू नको दुकानी
थोडा तरी असू दे व्यापार पारदर्शी
.
ना द्वेष शुद्ध तुमचा, ना प्रेम शुद्ध तुमचे
सांगा करू कशाची तक्रार पारदर्शी
.
प्रत्यक्ष होत नाही कल्याण का प्रजेचे
राजा तुझा नसावा दरबार पारदर्शी
.
चेंडूस एकदा ने वैकुंठ दाखवाया
तू मार पांडुरंगा षटकार पारदर्शी
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा