रांगेत येत जा तू,परतून जात जा तू;
जेव्हा मिळेल तुकडा शिस्तीत खात जा तू
.
आले दिवस सुखाचे,गरिबीस वैभवाचे,
झोपेत रोज ऐसी स्वप्ने पहात जा तू.
.
करणार बहुजनांचे कल्याण अर्थक्रांती;
राहून अर्धपोटी गुणगान गात जा तू.
.
पत्नी उभी कधीची औक्षण तुझे कराया,
घेऊन चार नोटा आता घरात जा तू !
.
जेव्हा मिळेल तुकडा शिस्तीत खात जा तू
.
आले दिवस सुखाचे,गरिबीस वैभवाचे,
झोपेत रोज ऐसी स्वप्ने पहात जा तू.
.
करणार बहुजनांचे कल्याण अर्थक्रांती;
राहून अर्धपोटी गुणगान गात जा तू.
.
पत्नी उभी कधीची औक्षण तुझे कराया,
घेऊन चार नोटा आता घरात जा तू !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा