पेज

८.११.१६

सावल्यांच्या अदांनी असा पोळलो

सावल्यांच्या अदांनी असा पोळलो ;
मी उन्हाच्या तऱ्हा ओळखू लागलो.

कालचे कोळसे तू उगाळू नको -
तू कशी वागली? मी कसा वागलो?

काळजाला तुझ्या झोंबले शब्द का ?
गोष्ट पोटातली सहज मी बोललो.

काढता लोकहो काय फोटो तुम्ही ?
हात द्या,वाचवा ! मी बुडू लागलो...

श्लोक शिकवू नको पंगतीचे मला
बालका मी तुझे  बारसे जेवलो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा