Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

मौनात अर्थ सारे...



मौनात अर्थ सारे,बोलू नकोस काही;
कविता मनातली ती शब्दात येत नाही.

“असतो कुठे तुझा रे मुक्काम रोज रात्री?”
वा-यास प्रश्न वेडे पुसतात लोक काही.

सोसून घेत जा तू चारीकडून चटके;
तेव्हा फुटेल मित्रा  गझलेत छान लाही.

रुक्मास गूज सांगे कानात सत्यभामा-
रात्री विठूस देते चोरून फूल राही.

सूर्यासमान देती उधळून जे स्वतःला,
त्यांची प्रकाशगाणी घुमती दिशात दाही.

(‘अनुष्टुभ’दिवाळी २०१२ वरून साभार)


शीर्षक क्लीक करा : गझल वाचा

*******************************************************
*******************************************************

.



  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP