Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

प्रेत


बोलक्यांचा बोलबाला;
जो मुका तो ठार झाला.

काळजी घे काळजाची;
वीज आली भेटण्याला.

पाय चेपा सूर्यदेवा;
झोपते ही बारबाला.

फाटका बाहेर थांबा;
आतुनी आवाज आला.

तोच खुंटा,तीच दोरी;
तीच आहे बंदिशाला.

आत्मघाती धर्म बोले;
प्रेत उचला;स्फोट झाला.

 (‘हंस’ दिवाळी २०११ वरून साभार)शीर्षक क्लीक करा : गझल वाचा

*******************************************************
*******************************************************

.
1 comments:

Yogesh Tayade,  २० ऑगस्ट, २०१३ रोजी ६:१५ PM  

Blog changla watla, mala mahit navte aata paryant, will check it continuously - Yogesh

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP