Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२.११.१२

गळातुटले नाते,सुटली मैत्री;छान आपला ग्लास भरावा;
मन मेले तर मरो बिचारे,खुशाल त्याला खांदा द्यावा.

गाव बुडाले,देश बुडाला;बुडू लागली देव-माणसे;
पोटामागे धावत धावत परदेशाचा मार्ग धरावा.

कवितेतल्या सुंदर ओळींनी सजवावी लग्नपत्रिका;
वधू चांगली कमावती अन वरून नगदी हुंडा घ्यावा.

पाठीमागे भिंतीवरती खिळून ठेवा कधी महात्मा;
नोटावरचा फोटो त्याचा कधी टेबलाखालुन घ्यावा

मुलगा-मुलगी,बहीण-भाऊ,काका-पुतण्या,मामा-भाचा;
बाप व्हावया या सर्वांचा जमेल त्याचा गळा चिरावा.

( ‘अनुष्टुभ’ दिवाळी २० ११ वरून साभार.)
_______________________________________


शीर्षक क्लीक करा : गझल वाचा

*******************************************************
*******************************************************

.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP