Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

१९.११.१०

फुटाणेतू वागतो कशाला देवादिकाप्रमाणे;
साध्याच माणसांचे आहे तुझे घराणे.


ती नोट काय कामी, जी फाटते कुठेही;
सांभाळ आपले तू कलदार एक नाणे.


घे काळजी थव्याची;विसरू नको पिलांना;
चोचीत घाल त्यांच्या तू दोनचार दाणे.


सौख्यात लोळणारा आहे पगार मोठा;
कां वाटते तरीपण येथे उदासवाणे?


राजीखुशीत नाचे लग्नात प्रेयसीच्या;
तो प्रेमवीर त्याची तकलीफ तोच जाणे!


पोटापुढे कधीही लाजू नकोस राजा;
बिनधास्त खात जावे थोडे तरी फुटाणे.
_________________________________________________________


शीर्षक क्लीक करा : गझल वाचा
*******************************************************
घास
*******************************************************

.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP