Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

८.१२.०९

रफिक़ शेख ह्यांच्या स्वरात : तुझ्या गुलाबी ओठांवरती...रफिक़ शेख हे
नव्या दमाचे,
रेशमी स्वराचे
तरूण गझलगायक आहेत.
त्यांनी गायिलेली ही एक सदाबहार गझल.
‘तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी’
तुम्ही ऐका.तुमच्या मित्रांना ऐकवा.
आणि-
तुम्हाला ही गझल कशी वाटली,
हे रफिक़ शेख ह्यांना जरूर कळवा.
त्यांचा भ्रमणध्वनी : ९९७०२७९९६८.
तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी;
चंद्र असावा मिठीत अन् धुंदीत रहावे ओठांनी.


नाजुक, कोमल, मऊ पाकळ्या तारुण्याने मुसमुसल्या-
फूल सुगंधी ओठांचे ते खुडून घ्यावे ओठांनी.


हळूच हसता लख्ख चांदणे अंगावरती बरसावे;
गालावरच्या खळीत तेव्हा सहद टिपावे ओठांनी.


किती युगांचे तहानलेले ओठ कोरडे झालेले;
खुशाल आता ओठांमधले अमृत प्यावे ओठांनी.


स्पर्श सांगती स्पर्शांना अन् डोळे वदती डोळ्यांना;
अशा घडीला मूक राहुनी फक्त पहावे ओठांनी. 


*******************************************************


*******************************************************
लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP