पेज

३.११.०८

पर्णात ओल नाही,झाल्यात जीर्ण शाखा


पर्णात ओल नाही,झाल्यात जीर्ण शाखा;
वृक्षावरी युगाच्या लावा नवी पताका.

तुमच्या शिळ्या कढीला का ऊत आणता रे?
चोचीत ह्या भुकेल्या ताजे नवीन टाका.

टाळा हुशार पाणी बेटे सनातनी ते;
चवदार या तळ्याला राखा असेच राखा.

रक्तास ह्या निधर्मी रे कुष्ठरोग आहे;
त्यानेच बघ असा हा आला प्रसंग बाका.

नाहीत शिष्य भोळे ते एकलव्य आता;
द्रोणास शक्य नाही शास्त्रोक्त भव्य डाका.

रक्ताळल्या पहाटे उगवेल सूर्य नक्की;
डाल्यात कोंबड्याला कोणी खुशाल झाका.
-------------------------------------------------
('समुचित' दिवाळी 1984)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा