पेज

३.३.०८

काय वर्णू ह्या स्तुतीचा थाट राजा

काय वर्णू ह्या स्तुतीचा थाट राजा;
पाळले तू मोठमोठे भाट राजा.


हे न सिंहासन कुणाच्या मालकीचे;
का हवा तुज सांग माझा पाट राजा.


पिंडदानादी विधींनी घाण केली;
छान होता ह्या नदीचा घाट राजा.


मी किती श्रीमंत आहे काय सांगू?
जवळ माझ्या फक्त फुटके ताट राजा.


घे दखल जनसागराच्या मंथनाची;
येत आहे धर्मवेडी लाट राजा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा